जालना जिल्हा हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी आहे. मराठवाडा विभागात तो उत्तर दिशेस येतो. जिल्ह्याचे अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय स्थान म्हणजे १९.१ उत्तर ते २१.३ उत्तर अक्षांश व ७५.४ पूर्व ते ७६.४ पूर्व रेखांश. जालना जिल्हा हा पूर्वी निजामाच्या राज्याचा भाग होता. नंतर मराठवाडा मुक्ती संग्रामानंतर तो औरंगाबाद जिल्ह्यामधील एक (जालना) तालुका झाला.
जालना हा औरंगाबादच्या पूर्वेकडील तालुका १ मे १९८१ रोजी ‘जिल्हा’ झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील जालना, भोकरदन, जाफ्राबाद, अंबड हे ४ तालुके व परभणी जिल्ह्यातील परतूर असे एकूण पाच तालुके जालना जिल्ह्यामध्ये समाविष्ट झाले. जालना जिल्ह्याच्या पूर्वेस परभणी व बुलढाणा जिल्हा असून, औरंगाबाद जिल्हा पश्चिम दिशेला आहे. उत्तरेला जळगाव जिल्हा असून दक्षिणेस बीड जिल्हा आहे.
अधिक माहिती.....