जिल्हा परिषद जालना

जालना जिल्ह्या विषयी

लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार

  • राज्याचे नाव : महाराष्ट्र
  • जिल्ह्याचे नाव : जालना
  • क्षेत्रफळ कि. मी. मध्ये: 7718 चौ.कि .मी
  • गट/गट विकास संख्या : 8
  • ग्रामपंचायतीची संख्या : 779

लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार :

  • ऐकून लोकसंख्या 19,58,483
  • पुरुष लोकसंख्या : 10,15,116 (51.84%)
  • महिला लोकसंख्या : 9,43,367 (48.16%)
  • अनुसूचित जाती लोकसंख्या : 2,72,266 (13.90%)
  • अनुसूचित जमाती लोकसंख्या : 42,263 (2.15%)

साक्षरता (%)

  • संपूर्ण साक्षरता : 1234433( 71.52%)
  • पुरुष साक्षरता : 735402 (81.53%)
  • महिला साक्षरता : 499031 (60.95%)

जालना जिल्ह्याची महत्वाची माहिती

  • महसुली गावांची संख्या : 9,72
  • ग्रामीण घरांची संख्या : 3,20,908
  • दारिद्ररेषेखालील कुटुंब संख्या : 3,13,103
  • ग्रामीण भागातील शाळांची संख्या : 1,501
  • अंगणवाडीची संख्या : 2,030
  • प्राथमिक आरोग्य केद्राची संख्या : 44
  • प्राथमिक उप-आरोग्य केद्राची संख्या : 223
  • पशु आरोग्य दवाखाने : 59

पर्यटन स्थळे व देवालये

जालना जिल्हा देवालयासाठी प्रसिध्द असुन राजुर ता. भोकरदन येथील गणपतीचे मंदीर , अन्वा ता. भोकरदन येथील माहेश्वराचे मंदिर आणि अंबड येथील मत्सोदरी देवीचे मंदिर तसेच नेर ता. जालना येथील वटेश्वराचे मंदिर , परतुर येथील नरसिंहाचे मंदिर , जालना शहरातील भैरवनाथाचे मंदिर, गणपती मंदिर, राम मंदिर, महानुभाव व जैन मंदिर देखिल प्रसिध्द आहे. तसेच जालना शहराच्या मध्यभागी जनार्धन मामांचा पुतळा आहे तसेच नागेवाडी येथील नालंदा बुध्द विहार प्रसिध्द आहे.

1. समर्थ रामदास स्वामी :- समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथे झाला. त्यांनी मनाचे श्लोक व दासबोध हे ग्रंथ लिहले आहेत. त्यांनी लोकांना देशाभिमानाची शिकवण दिली.

2. आनंदी स्वामी :- येथे आनंदी स्वामी नावाचे थोर संत होऊन गेले ते सर्वांशी समानतेने वागत. गरीबांना मदत करीत , जालना येथे त्यांची समाधी आहे.

3. जानअली व बाबाअली शहा :- जानअली व बाबाअली शहा हे संत देखिल याच जिल्ह्यात होऊन गेलेत. जालना शहरात त्यांचे दर्गे आहेत. व तेथे दरवर्षी उरुस भरतो.

4. राजुर :- भोकरदन तालुक्यातील राजुर येथे गणपतीचे मंदीर असुन संपुर्ण देशभरातुन मोठ्या प्रमाणात भक्तगण दर्शनास येतात.